Home संगमनेर संगमनेर तालुक्यात चाऱ्यातून आठ गायींना विषबाधा, दोन दगावल्या

संगमनेर तालुक्यात चाऱ्यातून आठ गायींना विषबाधा, दोन दगावल्या

Breaking News | Sangamner: आठ गाईंना चाऱ्यातून विषबाधा झाली आहे. वेळीच उपचार सुरू केल्याने सहा गाईंचे प्राण वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. मात्र, दुर्दैवाने दोन गाईंचा मृत्यू.

Eight cows poisoned by fodder in Sangamner taluka, two die

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील तुकाराम राधुजी लांडगे यांच्या मालकीच्या आठ गाईंना चाऱ्यातून विषबाधा झाली आहे. वेळीच उपचार सुरू केल्याने सहा गाईंचे प्राण वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. मात्र, दुर्दैवाने दोन गाईंचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लांडगे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे.

वडगाव लांडगा येथील तुकाराम लांडगे यांनी आपल्या गाईंना चारा दिला. मात्र, त्यानंतर काही वेळातच गाई अस्वस्थ होऊ लागल्याचे लक्षात आले. गाईंची प्रकृती अचानक बिघडत असल्याचे दिसताच लांडगे कुटुंबीयांनी तातडीने वडगाव लांडग्यातील स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांना माहिती दिली. डॉ. जाधव यांनी तातडीने धांदरफळ बुद्रुक येथील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. सचिन वर्षे व डॉ. राजाराम भांगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानी गाईची तपासणी करून आवश्यक उपचार तातडीने सुरू केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याना आठपैकी सहा गाईंचे प्राण वाचवण्यात यश आले. मात्र, दोन गाईंचा मृत्यू झाला. सध्या दोन गाईंवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी तुकाराम लांडगे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला, तसेच शासनाच्या माध्यमातून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

Breaking News: Eight cows poisoned by fodder in Sangamner taluka, two die

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here