एकनाथ शिंदेचा थोरातांना थेट इशारा! केसाला धक्का लावण्याची हिम्मत…..
Breaking News | Sangamner political rally Eknath Shinde: शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संगमनेरमध्ये झालेल्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका.
संगमनेर: शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संगमनेरमध्ये झालेल्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली. विशेष करून, गेल्या आठवड्यात संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या कीर्तनात झालेल्या राजकीय गोंधळावर, एकनाथ शिंदे यांनी थेट इशाराच दिला.
“वारकऱ्यांचा मुद्दाम सन्मान केला. वारकरी, कीर्तनकार महाराष्ट्राची ताकद आहेत. वारकऱ्यांच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कुणी करू नये. वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कुठं फेडणार हे पाप. हिंदू धर्माचा, सनातनाचा अपमान सहन करणार नाही. महाराष्ट्राचा हा भगवा शिवरायांचा आहे. स्वाभिमानाचा आहे,” असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला.
संगमनेरमधील शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाचे आणि आभार सभेत शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या घुलेवाडीतील कीर्तनातील राजकीय गोंधळानंतर एकनाथ शिंदे यांची आज होत असलेल्या सभेकडे लक्ष लागले होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “अमोल जायंट किलर ठरला, त्याचे अभिनंदन. पण संगमनेरकरांनी 40 वर्षांची सत्ता उलथवून लावली, त्यासाठी त्यांचे खास अभिनंदन. विधानसभा निवडणुकीत अमोलला खबऱ्या, खेळणं, असे म्हटलं गेलं. पण अमोलनेच तुमच्या हातात खुळखुळा दिला आहे. आता बसा खुळखुळा खेळत. अमोल काम करेल. त्याची खबर तुम्ही घेत राहा.” या विजयामुळे अमोल हा दिल्लीत देखील माहित पडला आहे, याचा अभिमान आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी स्टेजवर वारकरी कीर्तनकारांचा सत्कार करण्यात आला होता. याचा धागा पकडत एकनाथ शिंदे म्हणाले, “वारकऱ्यांचा मी मुद्दाम सन्मान केला. वारकरी, कीर्तनकार महाराष्ट्राची ताकद आहे. वाकऱ्यांनाच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कुणी करू नये. वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कुठं फेडणार हे पापा. हिंदू धर्म, सनातनाचा अपमान सहन करणार नाही. भगवा शिवरायांचा आहे. स्वाभिमानाचा आहे, हे लक्षात ठेवा.”
Breaking News: Eknath Shinde’s direct warning to Thorat