एक वर्षात संगमनेरची शांतता सुव्यवस्था बिघडली– माजी मंत्री बाळासाहेब थोरात
Breaking News | Sangamner Election | Balasaheb Thorat: दडपशाहीसह अमली पदार्थांची तस्करी वाढली असून संगमनेर शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडली असल्याची चिंता काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

संगमनेर: सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर व तालुका आपण राज्यात अग्रगण्य बनवला. सहकार, शिक्षण, अर्थव्यवस्था, याचबरोबर बंधू भावाचे वातावरण हे संगमनेर शहराचे वैशिष्ट्य होते. मात्र मागील एक वर्षापासून शहरांमध्ये दडपशाहीसह अमली पदार्थांची तस्करी वाढली असून संगमनेर शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडली असल्याची चिंता काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
मालदाड रोड येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी समवेत के.के थोरात ,शांताराम कढणे, विवेक कासार, सादिक तांबोळी सौरभ कासार सौ शोभाताई पवार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर शहरात विकासाच्या मोठमोठ्या योजना राबविल्या. डॉ. सुधीर तांबे यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळापासून सुरू झालेली विकासाची परंपरा सौ दुर्गाताई तांबे यांच्यापर्यंत आपण पाहिली. शांतता सुव्यवस्था बंधुभावाचे वातावरण ही शहराचे वैशिष्ट्य राहील. शहरासाठी ऐतिहासिक निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजना सुरू आहे. स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. सहकारामुळे शहरातील बाजारपेठ फुलली आहे. शिक्षण संस्थांमुळे बाहेरील विद्यार्थी संगमनेर मध्ये येत असून अर्थकारणाला गती मिळाली आहे. समृद्ध संगमनेर शहर हे वैशिष्ट्य आहे. अद्यावत असे संगमनेर बस स्थानक आपण निर्माण केले. संगमनेर बायपास तसेच नाशिक पुणे रोड चौपदरीकरण रस्ता आता त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू आहे .इंजिनिअरिंग कॉलेजचे संगमनेर बस स्थानक हा हॅपी हायवे तयार केला. कधीही फ्लेक्स बाजी केली नाही.
मागील एक वर्षापासून मात्र संगमनेर मध्ये अशांतता वाढली आहे. बस स्थानक फ्लेक्स बाजीने झाकलेले होते. शिवाजीनगर कडे जाणारे रस्त्यावर असलेल्या आपल्या कमानीवर इतरांनी डबल कमाल टाकली त्यातून त्यांची वृत्ती कळते.
ड्रग्स अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत परवा संगमनेर मधील 43 लाखांचे अमली पदार्थ पकडले गेले. दोन दिवसापूर्वी एका मुलाचा हात तोडला हात तुटलेला मुलगा आणि तोडणारा मुलगा कोण आहे तपासा. पोलीस स्टेशन मध्ये मारामाऱ्या होत आहेत. हे अशांत वातावरण आणि अशी संस्कृती आपल्याकडे कधीही नव्हती.
आपल्याला पुन्हा संगमनेरला गत वैभव प्राप्त करून द्यायचे असून सर्वांनी सेवा समिती उमेदवारांच्या पाठीशी भक्कम उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे मालदाड रोड परिसरातील कार्यकर्ते महिला युवक व नागरिकांनी जोरदार स्वागत केले.
Breaking News: Election Sangamner’s peace and order deteriorated in a year


















































