Home कोल्हापूर शाळेला कायमची सुट्टी मिळावी म्हणून झोपेतच शॉक दिला, पोलिसांनी सीसीटीव्ही पहिला अन…

शाळेला कायमची सुट्टी मिळावी म्हणून झोपेतच शॉक दिला, पोलिसांनी सीसीटीव्ही पहिला अन…

Breaking News | Kolapur Crime: एका अल्पवयीन मुलाने संस्थेतीलच झोपलेल्या ११ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा विजेचा शॉक देऊन खून केल्याची धक्कादायक घटना.

Electric Shocked in sleep to get permanent holiday from school

कोल्हापूर: शिक्षण संस्था बंद पडून कायमस्वरूपी सुट्टी मिळून घरी जायला मिळावे, या हेतूने एका अल्पवयीन मुलाने संस्थेतीलच झोपलेल्या ११ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा विजेचा शॉक देऊन खून केल्याची धक्कादायक घटना आज पोलिस चौकशीत उघड झाली.

हा प्रकार आळते (ता. हातकणंगले) येथील धार्मिक शिक्षण संस्थेत घडला. मृत मुलाचे नाव फैजान नाजिमा (रा. गमहरीया पंचायत, अचल जोकहाट बग्दहरा आरविया, बिहार. सध्या रा. आळते) असे आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी त्याच्या सहकारी अल्पवयीन विद्यार्थ्यास ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात केली.

आळते (ता. हातकणंगले) येथील धार्मिक शिक्षण देणाऱ्या निवासी संस्थेमध्ये ८० विद्यार्थी असून, त्यापैकी ७० विद्यार्थी बिहारमधील आहेत. सोमवारी (ता. १६) पहाटे पाच वाजण्यापूर्वी अल्पवयीन विद्यार्थी फैजान नाजिमा याचा झोपलेल्या अवस्थेत संशयास्पद मृत्यू झाला होता. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील व उपअधीक्षक रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार, त्यांनी त्याच शिक्षण संस्थेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, विद्यार्थ्याने कबूल केले की त्याने फैजान नाजिमाला झोपेत असताना इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन मारले.

शिक्षण संस्था कायमस्वरूपी बंद पडून घरी जायला मिळेल, या हेतूने अल्पवयीन संशयित विद्यार्थ्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री उशिरा कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्यामध्ये मुलाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल केला.

Breaking News: Electric Shocked in sleep to get permanent holiday from school

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here