Home अहिल्यानगर रील बनविण्याच्या नादात बसली फाशी अन झाले असे काही….

रील बनविण्याच्या नादात बसली फाशी अन झाले असे काही….

Breaking News | Ahilyanagar: एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने सोशल मीडियावर “फाशीचा रील” टाकण्यासाठी एका झाडाला फेटा बांधला व नातेवाईकांना व्हिडिओ काढण्यास सांगितला. गळफास घेण्याचा प्रयत्न करत असताना काही क्षणार्धात त्यास फाशी बसली.

execution was carried out in the middle of making a reel.

जामखेड: शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने सोशल मीडियावर “फाशीचा रील” टाकण्यासाठी एका झाडाला फेटा बांधला व नातेवाईकांना व्हिडिओ काढण्यास सांगितला. गळफास घेण्याचा प्रयत्न करत असताना काही क्षणार्धात त्यास फाशी बसली पण याच सुमारास व्हिडीओ करणा-या नातेवाईकांनी त्वरीत फेट्याची गाठण दगडाने तोडली व त्यास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

सध्या तो उपचारास प्रतिसाद देत असून प्रकृती स्थिर आहे. एका हॉटेलमध्ये वेटर काम करणारा प्रकाश भीम बुडा (वय १७, रा. नेपाळ) हा नातेवाईक असलेला मामा मिलन बुडा (रा. नेपाळ) हे दोघे फाशी घेतानाच रिल काढण्यासाठी फेटा घेऊन मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास जामखेड करमाळा रस्त्यावरील खटकळीच्या झाडीत गेले तेथे असलेल्या झाडाच्या फांदीला प्रकाश बुडा याने फेटा बांधला व गळफास तयार केला व नातेवाईक मामा यास व्हिडीओ काढायला लावला या दरम्यान त्याने नेपाळी भाषेत रिलला साजेसी भाषा तयार बोलला व गळफास गळ्यात घातला. क्षणार्धात त्याचे गुडघे जमिनीवर टेकले. व्हिडीओ काढणा-या मामाने प्रसंगावधान राखून फेट्याची गाठ दगडाने तोडली तोपर्यंत प्रकाश बुडा हा बेशुद्ध पडला होता.

नातेवाईक मामा याने हॉटेल मालकास फोनवर घडलेली घटना सांगितली. त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अम्ब्युलन्स घेऊन बोलवले व उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार चालू केले आहे. गळफास बसल्याने मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही, त्यामुळे रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असून धोका अद्याप टळला नसल्याचे सांगितले.

Breaking News: execution was carried out in the middle of making a reel.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here