संगमनेर: धर्मांतर करण्यासाठी कुटुंबाला दिली जिवे मारण्याची धमकी
Breaking News | Sangamner Crime: धर्मातर करण्यासाठी कुटुंबाला आमिष दाखवून दबाव आणला; पण यश न आल्याने कुटुंबाला जिवे मारून टाकीन, अशी धमकी.
संगमनेर: धर्मातर करण्यासाठी कुटुंबाला आमिष दाखवून दबाव आणला; पण यश न आल्याने कुटुंबाला जिवे मारून टाकीन, अशी धमकी देण्यात आली. हा प्रकार सोमवारी (दि. २४) दुपारी पठार भागातील दरेवाडी येथे घडला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. २८) एकाविरोधात घारगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरेवाडी (ता. संगमनेर) येथील मजुरी करणाऱ्या २२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गंगाराम नवनाथ पवार (रा. चिंचपूर) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. संबंधित महिला तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबत दरेवाडी येथे राहते. गंगाराम पवार या महिलेचा नातेवाईक आहे. तो त्यांच्या घरी येऊन धर्मांतर करण्यासाठी कुटुंबाला आमिष दाखविणे, कुटुंबातील सदस्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता.
सोमवारी पवार दरेवाडी येथे महिलेच्या घरी गेला. तुम्हाला तुमचा धर्म सोडायचा नसेल तर तुमच्या कुटुंबांना जिवे मारून टाकीन, अशी धमकी त्याने महिलेला दिली. त्यानंतर तिच्या हातात बळजबरीने धागा बांधून, पाणी शिंपडले, धार्मिक भावना दुखावल्या, तसेच या महिलेच्या जाव, तिला देखील त्याने, धर्म स्वीकार, नाहीतर तुला नांदू देणार नाही. तुला तुझ्या आई-वडिलांच्या घरी नेऊन घालीन, अशी धमकी दिली. त्यानंतर तो शिवीगाळ करून निघून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.
Web Title: Family threatened to kill them for converting them to Islam