Home संगमनेर संगमनेरातील ‘शेतकऱ्याने कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर’; भाव नसल्याने हतबल; खर्च आला अंगलट

संगमनेरातील ‘शेतकऱ्याने कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर’; भाव नसल्याने हतबल; खर्च आला अंगलट

Breaking News | Sangamner:  कांदा काढला, पण चांगला भाव नसल्याने बाजारात विकायला नेलाच नाही… एवढ्या कष्टाने घेतलेलं पीक शेवटी रोटाव्हेटरखाली गाडावं लागलं. सरकार कुठं आहे? दिवाळी तरी कशी साजरी करायची? अशा शब्दांत व्यथा मांडली.

Farmer in Sangamnera turns rotavator on onions

संगमनेर: कांदा काढला, पण चांगला भाव नसल्याने बाजारात विकायला नेलाच नाही… एवढ्या कष्टाने घेतलेलं पीक शेवटी रोटाव्हेटरखाली गाडावं लागलं. सरकार कुठं आहे? दिवाळी तरी कशी साजरी करायची? अशा शब्दांत पेमरेवाडी (ता. संगमनेर) येथील शेतकरी सखाराम डोंगरे यांनी आपली व्यथा मांडली.

पेमरेवाडी येथील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांद्याचं पीक घेतलं होतं. गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने दिवाळी जोरात साजरी झाली होती. मात्र, यंदा नुसता पाऊसच नव्हे, तर भाव नसल्यानेही शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. पावसाने कांदा पिकाला फटका दिलेला असतानाही शेतकऱ्यांनी मेहनतीने कांदा काढून घेतला. पण बाजारभाव इतका घसरला की, कांदा विकणेच परवडेनासे झाले. योग्य भाव मिळत नसल्याने नफा सोडाच, उलट तोटा होतोय. मजुरी, वाहतूक खर्च जाऊन उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. परिणामी, काही शेतकऱ्यांनी हा कांदा शेतातच फेकून दिला, तर काहींनी संतापाच्या भरात त्यावर थेट रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट केलं.

पेमरेवाडीचे शेतकरी सखाराम डोंगरे यांनी यावर्षी दोन एकर क्षेत्रात लाल कांद्याचे पीक घेतले होते. एकूण ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत खर्च झाला. पीक चांगले आले, पण बाजारात भाव कमी असल्याने खर्च भरूनही निघणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी थेट संपूर्ण कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला.

दोन एकर कांद्यासाठी जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आला आहे. कांद्याचे चांगले पैसे होतील, अशी अपेक्षा देखील होती. पण स्वप्नांवर पाणी फिरले आहे. केवळ बाजारभाव नसल्याने काढलेल्या कांद्यावर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वच खर्च अंगलट आला आहे. – सखाराम डोंगरे, कांदा उत्पादक

Breaking News: Farmer in Sangamnera turns rotavator on onions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here