अहिल्यानगर: आधी अपहरण मग मर्डर करून उसात फेकलं, बर्थडे पार्टीच्या पैशांसाठी खुनी खेळ
Breaking News | Ahilyanagar Crime: सात अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या. केवळ वाढदिवासीची पार्टी साजरी करण्यासाठी या मुलांनी एका व्यक्तीचा खून केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं सात अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी उसाच्या कांडक्याने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करत गळा आवळून ही हत्या केली आहे. ४२ वर्षीय मयत गणेश सखाहरी चत्तर मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा एका उसाच्या फडात मृतदेह आढळला होता. आता पोलिसांनी मोबाईलवरून या हत्याकांडाचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नांदुर्खी बुद्रुक शिवारात बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या उसाच्या शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. याबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल पोलिसांना १३ जूनला दिला होते. याप्रकरणी तपास केला असता बेपत्ता व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तसेच हा मृतदेह गणेश सखाहरी चत्तर यांचा असल्याचं तपासात समोर आलं.
आरोपींनी चत्तर यांचा खून केल्यानंतर त्यांचा मोबाइल शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला. दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाइल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला. त्यानंतर या खुनाला वाचा फुटली.
घटनेच्या दिवशी गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात होते. यावेळी त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांना उसाच्या कांडक्याने, हाताने मारहाण करण्यात आली. दरम्याने एका आरोपीनं त्यांचा गळा दाबला. त्याच वेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाइल काढून घेतला. हा मोबाइल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला, पैशांच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली. यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती. त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले. या सर्व विधीसंघर्षित मुलांना रविवारी न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे.
Breaking News: First kidnapped, then murdered and thrown into the river, a murderous game