शिर्डी हादरली! विहिरीत एकाच कुटुंबातील पाच मृतदेह आढळले…
Breaking News | Shirdi Suicide: बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील राहता तालुक्यात घडली.
शिर्डी : बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील राहता तालुक्यात घडली. कोऱ्हाळे गावच्या शिवारातील एका विहिरीत पाच मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. अरुण काळे (वय 30 वर्ष) याने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली.
अरुण काळे याने राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावच्या शिवारात हे कृत्य केलं. त्याने रस्त्याच्या बाजूला आपली टू व्हीलर लावल्याचं दिसून आलं. शिवानी अरुण काळे (वय 8 ), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6) आणि कबीर अरुण काळे (वय 5) अशी मयत मुलांची नावे आहेत. या चौघांना अरुण काळेने पाण्यात ढकलून दिलं. शेवटी स्वतःही हात-पाय बांधून आत्महत्या केली.
अरुण काळे हा अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव या गावात राहायचा. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. घरातील वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे अरुण काळेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून अद्याप दोघांचा शोध सुरू आहे. जवळपास 45 फूट खोल ही विहीर आहे. त्यातच पाऊस पडत असल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे. एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत अरुण काळेचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे स्वतःचे हात पाय स्वतः बांधून अरुण काळेने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Breaking News: Five bodies of the same family found in a well Suicide