Home जालना कार विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

कार विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

Breaking News | Jalna Crime: जालन्यातील घटना; सात तासांनी बाहेर काढले मृतदेह.

Five people died after car fell into a well

जालना : मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन युवकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. कारने धडक दिल्याने एक इसमही गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास टेंभुर्णी-राजूर मार्गावरील गाढेगव्हाण पाटीजवळ घडली. घटनेनंतर ७० फूट खोल आणि पाण्याने भरलेल्या विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनास तब्बल सात तास लागले.

ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे (५५), पद्माबाई लक्ष्मण भांबिरे (५५), अजिनाथ तुळशिराम भांबिरे (४०, तिघे रा. कोपर्डा, ता. भोकरदन), निर्मला सोपान डकले (२५), ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले (४०, दोघे रा. गेवराई गुंगी, ता. फुलंब्री) अशी मृतांची नावे आहेत. मृत निर्मला यांचे पती सोपान डकले हे मराठा आंदोलनासाठी मुंबईला गेलेले आहेत.

Breaking News: Five people died after car fell into a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here