Home संगमनेर संगमनेर: मित्राने केला खून; दोनशे रुपयांच्या उसनवारीचा वाद, चौघा जणांना अटक

संगमनेर: मित्राने केला खून; दोनशे रुपयांच्या उसनवारीचा वाद, चौघा जणांना अटक

Breaking News | Sangamner Murder Crime: २०० रुपयांच्या कर्जामुळे मतीन मेहबूब शेख (२५) नावाच्या तरुणाची त्याच्या मित्राने हत्या केली.

पीडितेची आई बिल्किस उर्फ शकीरा मेहमूद शेख यांनी तक्रार दाखल केली की, आसिफ शेखने तिच्या मुलाच्या पाठीत खिळ्याने वार केले.

या हत्येप्रकरणी आसिफ सलीम शेख, सोहेल आंधळे, पप्पू भांड आणि गौतम गायकवाड या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना प्रतापनगर येथील सरकारी अतिथीगृहाजवळ घडली, जिथे कर्ज न फेडल्याबद्दल झालेल्या जोरदार वादानंतर पीडितेवर हल्ला करण्यात आला.

Friend commits murder Dispute over loan of Rs 200, four arrested

संगमनेर : अवघ्या दोनशे रुपये उसनवारीतून झालेल्या वादात मित्राने मित्राचा खून केल्याची घटना आश्वी बुद्रुक येथे घडली. मतीन मेहबूब शेख (वय २५), असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मयत मतीन शेख याची आई बिलकीस ऊर्फ शाकिरा महेमूद शेख यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. ८) रात्री ०८.४५ वाजेच्या सुमारास मुजफ्फर याला आसीफ शेख याने फोन करून मतीन यांच्या पाठीत खिळा घुसला आहे. तुम्ही तात्काळ लोणी येथील प्रवरा रुग्णालयात या, असे सांगितले. बिलकीस शेख रुग्णालयात गेल्या असता मुलगा मतीन बसलेला होता. त्याने प्रतापपूर शिवारातील शासकीय विश्रामगृहाशेजारी मंदिराजवळ बसलो असताना आसीफ सलीम शेख, सोहेल आंधळे, पप्पू भांड, गौतम गायकवाड यांच्याबरोबर माझी बाचाबाची झाली. आसीफ शेख याला उसने दिलेले दोनशे रुपये त्याच्या वडिलांकडे मागितल्याचा राग आल्याने त्याने पाठीत खिळा भोसकून जखमी केल्याचे आई बिलकीस मतीन हिला सांगितले.

जखमी मतीन याच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारसाठी पुणे येथे दाखल केले. मात्र, सकाळी औषधोपचारादरम्यान मतीन याचा मृत्यू झाला. दरम्यान, आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Breaking News: Friend commits murder Dispute over loan of Rs 200, four arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here