सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग करून तरुणीवर अत्याचार
Breaking News | Jalgaon Crime: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत तरुणीला ब्लॅकमेलिंग करत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना.
जळगाव: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत तरुणीला ब्लॅकमेलिंग करत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली. या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७) असं संशयित नराधम तरुणाचे नाव आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावातील तरुणी हि महाविद्यालयीन शिक्षणासाठी एरंडोल येथे वास्तव्यास आहे. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीची ओळख बुलढाणा जिल्ह्यातील बरेजवळा येथील विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७) या तरुणासोबत इन्स्ट्राग्रामवरून झाली. ऑगस्ट २०२४ मध्ये ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा तरुणाने उचलल्याचे समोर आले आहे.
दरम्यान विश्वजीत सिसोदे याने सदर तरुणीची चांगली मैत्री करत तिला लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर तिला जळगाव एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. यानंतर हॉटेलवर तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबध प्रस्तापित केले. इतकेच नाही तर त्याने काही व्हिडीओ व फोटो देखील काढले. हे आक्षेपार्ह व्हीडीओ, व्हॅट्सॲप चॅट तरुणीला तिच्या आई- वडिलांना दाखविण्याची भीती दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार (abused) केला.
तसेच पीडित तरुणीच्या वडिलांना व्हॉट्स ॲपवरून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी पीडित तरुणीने कंटाळून घडला प्रकार पालकांना सांगितला. तत्काळ पालकांनी पीडितेला घेत एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. घडल्या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून बुलढाणा जिल्ह्यातील विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे याच्याविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: Friendship through social media, then blackmailing and abusing a young woman