Home नाशिक गिरीश महाजन नाशिकमध्ये असतानाच भाजप नेत्याला पोलिसांनी उचललं; राजकीय वर्तुळात खळबळ

गिरीश महाजन नाशिकमध्ये असतानाच भाजप नेत्याला पोलिसांनी उचललं; राजकीय वर्तुळात खळबळ

Breaking News | Nashik Crime : पंचवटी परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात  मोठी कारवाई करत पंचवटी पोलिसांनी  भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील  यांना अटक केली.

Girish Mahajan was picked up by the police while he was in Nashik

नाशिक: नाशिक शहरातील पंचवटी परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात  मोठी कारवाई करत पंचवटी पोलिसांनी  भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील  यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये असतानाच जगदीश पाटील यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर विठ्ठल जाधव या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य आणि टोळीयुद्ध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात 11 आरोपींना अटक केली होती. तर दोन आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.

आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Breaking News: Girish Mahajan was picked up by the police while he was in Nashik

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here