Home पुणे मुलीला आत्याच्या घरी बोलावून अत्याचार

मुलीला आत्याच्या घरी बोलावून अत्याचार

Breaking News | Pune Crime: अल्पवयीन युवतीवर अत्याचार करत अश्लील फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक.

Girl called to uncle's house and raped

खेड: अल्पवयीन युवतीवर अत्याचार करत अश्लील फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल करणाऱ्या अजय नामदेव पवार (25) याला येथील पोलिसांनी बुधवारी अटक केली. पीडित युवतीस शिवीगाळीसह ठार मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

मार्च-एप्रिल 2021 पासून पुढे पीडित युवतीशी ओळख झाल्यानंतर दोन महिन्यांनी तिला आत्याच्या घरी बोलावले होते. पीडित युवती येथे आली असता तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. या बाबत वाच्यता केल्यास शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली होती. एवढ्यावरच न थांबता 8 जून 2025 रोजी एका तरुणाशी तिचे लग्न जमले असता त्याच्या इस्टाग्रामवर अश्लील फोटो व्हायरल करत ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अधिक तपास दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करीत आहे.

Breaking News: Girl called to uncle’s house and raped

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here