Home जालना शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत मुलीची आत्महत्या

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत मुलीची आत्महत्या

Breaking News | Jalna: शिक्षकांच्या त्रासामुळे पाऊल उचलले; पालकांचा आरोप.

Girl commits suicide by jumping from third floor of school

जालना : शहरातील एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील सीटीएमके गुजराती विद्यालयात घडली.

कंटाळून शिक्षकांच्या त्रासाला मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. आरोही दीपक बिटलान (वय १३, रा. मस्तगड जालना) असे मयत मुलीचे नाव आहे. मुलीच्या आत्महत्या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जालन्यात खळबळ

जालना शहरातील मस्तगड भागात राहणारी आरोही बिटलान ही सीटीएमके गुजराती विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत होती. आरोही ही शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. वर्गात गेल्यानंतर काही वेळाने ती शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तेथून तिने उडी घेत आत्महत्या केली.

घटनेनंतर शिक्षकांनी तिला प्रारंभी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून नंतर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

पोलिस म्हणतात, तपास सुरू

पालकांचे आरोप असोत किंवा शाळा प्रशासनाचे म्हणणे असो, सर्व बाजूंनी या घटनेचा तपास केला जात असल्याची माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Breaking News: Girl commits suicide by jumping from third floor of school

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here