Home पुणे प्रेयसीच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध, ११ जणांनी मिळून प्रियकराची केली हत्या

प्रेयसीच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध, ११ जणांनी मिळून प्रियकराची केली हत्या

Breaking News | Pune Crime: प्रेयसीच्या कुटुंबांचा लग्नाला विरोध होता. त्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला.

Girlfriend's family opposed the marriage, 11 people killed the boyfriend

पुणे: पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ वर्षीय तरुणाची ११ जणांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.

मृत तरुणाच्या प्रेयसीच्या कुटुंबांचा लग्नाला विरोध होता. त्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मृतकाचे नाव रामेश्वर घेंगट असे आहे.

अधिक माहिती अशी की, ही घटना २२ जुलै रोजी पिंपरीतील सांगवी परिसरात असलेल्या देवकर पार्कमधील एका खोलीत घडली. रामेश्वर घेंगट याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रामेश्वरचा स्वभाव आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. परंतु दोघेही लग्नावर ठाम होते. म्हणून तरुणीच्या कुटुंबीयांनी रामेश्वरला लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले. रामेश्वरला एका खोलीत नेले. तिथे दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला आणि याच वादातून तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेले. तिथे त्याच्या गुप्तांगावर, डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर बेदम मारहाण केली. यात रामेश्वर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.

या घटनेची माहिती सांगवी पोलिसांना मिळताच, त्यांनी रामेश्वरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर घेंगटला मारहाण करून खून केल्याप्रकरणी तरुणीचे वडील प्रशांत सारसर, करण खोकरसह एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य फरार दोन  आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

Breaking News: Girlfriend’s family opposed the marriage, 11 people killed the boyfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here