Home औरंगाबाद ग्रामपंचायत लिपिकाचा विवाहितेवर कार्यालयातच अत्याचार

ग्रामपंचायत लिपिकाचा विवाहितेवर कार्यालयातच अत्याचार

Breaking News | Rape: ग्रामपंचायतमधील लिपिकाने विवाहितेवर कार्यालयासह अन्य ठिकाणी तीन वेळा अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली.

Gram Panchayat clerk abused married woman in office

छत्रपती संभाजीनगर:  झाल्टा ग्रामपंचायतमधील लिपिकाने विवाहितेवर कार्यालयासह अन्य ठिकाणी तीन वेळा अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रे-वणनाथ कारभारी शिंदे (रा. झाल्टा) असे आरोपीचे नाव असून, त्याने पीडितेला एके ठिकाणी उदरनिर्वाहासाठी काम मिळवून दिले होते. त्यानंतर शिंदेने नोव्हेंबर २०२४, २९ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी पीडितेवर अत्याचार केला. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागतच शिंदे फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

३१ वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार, झाल्टा ग्रामपंचायतचा लिपिक रेवणनाथ शिंदे सोबत गावातील असल्याने ओळख होती. त्याला पीडितेने स्वतःसाठी काही तरी कामधंदा बघ, असे सांगितले होते. त्यावरून त्याने तिला एकाजागी काम मिळवून दिले होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये पीडिता कामावर जात असताना आरोपी शिंदे याने तिला झाल्टा ग्रामपंचायत कार्यालयात बळजबरी केली होती.

मात्र बदनामीच्या भीतीपोटी पीडितेने कोणास काही सांगितले नाही. त्यानंतर पुन्हा शिंदेने २९ ऑगस्ट रोजी पीडितेला एकटी गाठून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. घावरून पीडिता कोणाला काही सांगत नसल्याने ४ सप्टेंबर रोजी दुपारी पीडितेशी गोड-गोड बोलून पुन्हा शिंदेने अत्याचार केला.

त्यामुळे पीडितेला मोठा धक्का बसला. तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर चिकलठाणा पोलिस ठाण्यात पीडितेने धाव घेत तक्रार दिली. त्यावरून गुरुवारी (दि.११) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शिंदे फरार झाला आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Breaking News: Gram Panchayat clerk abused married woman in office

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here