Home अहिल्यानगर नाव गुप्त ठेवत साई चरणी महादान, दुबईच्या भक्ताने दिलेल्या दानाची किंमत ऐकून...

नाव गुप्त ठेवत साई चरणी महादान, दुबईच्या भक्ताने दिलेल्या दानाची किंमत ऐकून हादरून जाल

Breaking News | Shirdi Sai Baba: शिर्डीच्या साईबाबांवर मोठी श्रद्धा आहे. आज ते जे काही आहे ते साई बाबांमुळे आहेत अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे न विसरता हे भक्त दर वर्षी साईच्या दर्शनाला शिर्डीत येत असतात. यावेळी ते साईच्या चरणी मोठं दान.

great donation to Sai Baba while keeping his name anonymous, you will be shocked to hear the value

शिर्डी: साई बाबांचे अनेक भक्त हे जगभर पसरले आहेत. त्यांची शिर्डीच्या साईबाबांवर मोठी श्रद्धा आहे. आज ते जे काही आहे ते साई बाबांमुळे आहेत अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे न विसरता हे भक्त दर वर्षी साईच्या दर्शनाला शिर्डीत येत असतात. यावेळी ते साईच्या चरणी मोठं दान ही देतात. काही जण ऐवढं मोठं दान देतात की अनेक जण विचारात पडतात. पण श्रद्धे पुढे काही नसतं हेच खरं म्हणावं लागेल. काही भक्त तर नाव गुप्त ठेवून दान देतात. अशाच एका भक्ताने आता साई चरणी मोठं दान दिलं आहे.

नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर एका साई भक्ताने महादान साई चरणी दिलं आहे. हा भक्त दुबईतला रहिवाशी आहे. शिवाय तो दर वर्षी साई दर्शनला शिर्डीत येत असतो. या भक्ताने चाई चरणी “ॐ साई राम”  ही अक्षरं अर्पण केली आहे. पण ही अक्षरं साधीसुधी नाहीत. तर ही अक्षर सोन्याची आहेत. या सोन्याच्या अक्षरांचे वजन 1600 ग्रॅमपेक्षा जास्त आहे. त्याची बाजार भावानुसार किंमत ऐकून तुम्ही नक्कीच हादरून जाल. ऐवढं मोठं दान देवूनही या भक्ताने आपलं नाव गुप्त ठेवण्याची विनंती साई संस्थानला केली होती.

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नाव गाव गुप्त ठेवतं एका भाविकांन तब्बल दिड कोटी रुपयांचा महादान केलं आहे. साईचरणी दररोज लाखो भाविक मनोभावे दर्शन घेतात. श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भक्त विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. आज मात्र एका साईभक्ताने बाबांच्या चरणी सुवर्ण अक्षरांत “ॐ साई राम” अर्पण करून आपल्या श्रद्धेची अनोखी शिदोरी अर्पण केली आहे. एका श्रद्धावान साईभक्ताने तब्बल 1600 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची, तब्बल 1 कोटी 58 लाख 50 हजार 989 रुपये किंमतीची सुवर्ण अक्षरे अर्पण केली आहेत.

“ॐ साई राम” अशी सुवर्णाक्षरे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या स्वाधीन करण्यात आली. त्यानंतर ती समाधी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली असून सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हा भक्त नियमित शिर्डीत येतो असं  ट्रस्टचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. त्यांना साई चरणी दान द्यायचे होते. तशी त्यांची इच्छा होती. पण नाव गुप्त ठेवावे असं ही त्यांनी सांगितलं होतं असं गाडीलकर यांनी सांगितले. त्यानुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. संस्थानतर्फे या अनमोल दानाबद्दल साईभक्तांचा सत्कार करण्यात आला. भक्ताच्या इच्छेनुसार त्यांचे नाव मात्र गुप्त ठेवण्यात आलं आहे.

Breaking News: great donation to Sai Baba while keeping his name anonymous, you will be shocked to hear the value

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here