Home संगमनेर संगमनेर तालुक्यात या परिसरात मुसळधार पाऊस; शेतात पाणी

संगमनेर तालुक्यात या परिसरात मुसळधार पाऊस; शेतात पाणी

Breaking News | Sangamner Rain Update: आश्वी भागातील सादतपूर येथे बंधारा भरल्याने बोरसे वस्ती येथील ७ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

Heavy rain in this area of ​​Sangamner taluka

संगमनेर आश्वी: संगमनेर शहर आणि परिसरातील गावांमध्ये तसेच तालुक्याच्या इतरही गावांमध्ये शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळपर्यंत सुरूच होता. कोकणगाव, सावरगाव तळ, कौठे कमळेश्वर, पारेगाव बुद्रुक, माळेगाव हवेली आदी गावांमध्ये घरांची पडझड झाली.

आश्वी भागातील सादतपूर येथे बंधारा भरल्याने बोरसे वस्ती येथील ७ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेत केली.

ओझर खुर्द येथे आदिवासी, दलित कुटुंबीय राहत असलेल्या वस्तीमधील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तेथील साधारण १२ ते १३ कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच दाढ खुर्द येथेही ओढ्याला पूर आल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले होते. अशी माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली. कोकणगाव, माळेगाव हवेली आणि इतरही ठिकाणी आमदार अमोल खताळ यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. मदत मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. गोठ्यांमध्येही पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्यासाठी रात्र जागून काढावी लागली.

कोकणगाव, सावरगाव तळ, कौठे कमळेश्वर, पारेगाव बुद्रुक, माळेगाव हवेली आदी गावांमध्ये धरांची पडझड झाली.

कोकणगाव येथील संजय भोसले यांच्या घराची भिंत पावसाने कोसळली असल्याची माहिती समजतात आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ संजय भोसले यांच्या वस्तीवर अधिकाऱ्यांच्या समवेत ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढत पडलेल्या घराची पाहणी केली. याच परिसरातील अण्णासाहेब भोसले यांच्या कांद्याच्या पिकात बंधाऱ्याचे पाणी घुसले असून, त्यांचे पीक नष्ट झाले आहे. तसेच, बाळू नाना साबळे यांच्या घराची भिंत पडली असल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले. या पडलेल्या घराचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना कशी लवकरात लवकर मदत मिळून देण्याचे निर्देश आमदार खताळ यांनी दिले.

मदतीसाठी विखे-पाटील यांचे केंद्र सुरू
जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Breaking News: Heavy rain in this area of ​​Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here