अहिल्यानगर: मुलीला गोडाऊनमध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात आणि तोंड दाबून तिच्यावर अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीला गोडाऊनमध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात आणि तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल.
जामखेड : दुकानामध्ये सामान घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला गोडाऊनमध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात आणि तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसरा मुख्य आरोपी फरार आहे. या घटनेबाबत आमदार रोहित पवार यांनी पोलिस अधीक्षकांकडे तातडीने आरोपी अटक करण्याची मागणी केली आहे. जामखेड तालुक्यातील एका गावात २९ जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी आणि तिची आई दुकानात असताना त्या ठिकाणी आरोपी मनोज महादेव हुंबे (वय २५ रा. बोर्ले,
ता. जामखेड) व त्याच्यासोबत त्याचा एक अल्पवयीन आरोपी मित्र असे दोघे जण दुकानात आले. अल्पवयीन मुलगा हा अल्पवयीन मुलीच्या वर्गातीलच आहे. सामान घेण्यासाठी फिर्यादीची अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे त्यांच्या घराजवळील गोडाऊनमध्ये आले. यावेळी अल्पवयीन मुलाने मुलीचे तोंड दाबले आणि दोन्ही हात पकडले, तर आरोपी मनोज हुंबे याने पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळाहून आरोपी पळून गेले. यानंतर घडलेला प्रकार पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या आईला सांगितला व त्यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी जामखेड पोलिस स्टेशनला धाव घेतली.
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मनोज महादेव हुंबे (वय २५) आणि त्याचा एक अल्पवयीन मित्र या दोघांवर जामखेड पोलिस स्टेशनला पॉक्सो व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील अल्पवयीन मुलास अहिल्यानगर येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून, दुसरा आरोपी मनोज हुंबे हा अद्याप फरार आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.
आमदार रोहित पवार यांच्याकडून निषेध
माझ्या मतदारसंघात एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलीसोबत झालेला अत्याचाराचा प्रकार घृणास्पद असून या कृत्याचा तीव्र निषेध करतो. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांशी बोलणे झाले आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत? गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही का, असा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून महाराष्ट्रात एकाही भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीही हिंमत होता कामा नये, असे मत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.
Breaking News: help of a friend, the girl was abused by pressing her hands and mouth.