Breaking News | Ahilyanagar: पती-पत्नीने थेट नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना पत्नीचा जीव वाचला, पतीचा शोध सुरू.
धामोरी कोपरगाव तालुक्यातील मळेगावथडी गावाजवळ बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पुलावरून अण्णासाहेब केरू रनशूर (वय ५७) व सखुबाई अण्णासाहेब रनशूर (वय ५२) या पती-पत्नीने थेट नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली.
घटनेच्या वेळी पुलाजवळ असलेले काही स्थानिक तरुण प्रसंगावधान राखून तत्काळ नदीकाठी धावले. प्रवाहात वाहत
मळेगावथडी गावातील अनेक तरुणांनीही पोलिसांना सहकार्य करत नदीपात्रात शोधकार्य सुरू ठेवले आहे.
जाणाऱ्या महिलेचा जीव वाचवण्यात तरुणांना यश आले आहे. मात्र, अण्णासाहेब रनशूर हे पाण्याच्या प्रचंड लाटेत वाहून गेले असून, ग्रामस्थ व प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्य तातडीने हाती घेतले. मळेगावथडी गावातील अनेक तरुणांनीही पोलिसांना सहकार्य करत नदीपात्रात शोधकार्य सुरू ठेवले आहे. पाण्यात हरवलेल्या व्यक्तीचा शोध लवकर लागेल अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. रणशूर दाम्पत्य हे शेतकरी आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Breaking News: Husband and wife jump into Godavari river