Home संगमनेर संगमनेर: पतीला मारहाण, पत्नीचा विनयभंग – गुन्हा दाखल

संगमनेर: पतीला मारहाण, पत्नीचा विनयभंग – गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner:  वादात दुचाकीवरील दोघांनी पतीस मारहाण केली तर पत्नीचा विनयभंग केल्याची घटना.

Husband beaten, wife molested - case registered

संगमनेर: सिन्नर तालुक्यातील दुसिंगवाडी येथील पती-पत्नी कारमधून लोणीकडे दवाखान्यात जात असताना त्यांच्या कारचा दुचाकीला कट लागला. त्यावरुन झालेल्या वादात दुचाकीवरील दोघांनी पतीस मारहाण केली तर पत्नीचा विनयभंग केल्याची घटना लोहारे गावच्या शिवारात तीन दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की दुसिंगवाडी येथील पती-पत्नी कारमधून लोणीकडे दवाखान्यात चालले होते. दरम्यान, लोहारे शिवारात त्यांच्या कारचा दुचाकीला कट बसल्याने तिचा आरसा फुटला.

त्यावर पती-पत्नी नुकसान भरपाई देण्यास तयार झाले. परंतु, दुचाकीवरील बाळासाहेब केरुनाथ विखे (रा. लोणी, ता. राहाता) व अनोळखी इसमाने दोघांनाही शिवीगाळ करत कारचालकास चापटीने मारहाण केली. तेव्हा कार चालकाची पत्नी वाद सोडविण्यास गेली असता दुचाकीस्वाराने त्यांचा हात धरुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन दमदाटी केली.

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन बाळासाहेब केरुनाथ विखे व अनोळखी इसम अशा दोघांवर तालुका पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. डमाळे हे करत आहे.

Breaking News: Husband beaten, wife molested – case registered

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here