अकोले: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा केला खून
Breaking News | Akole Crime: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला लाकडी काठीने मारहाण करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना.
अकोले: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला लाकडी काठीने मारहाण करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना अकोले तालुक्यातील रतनवाडी येथे घडली आहे. चांगुणाबाई लहू झडे (वय ३९) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रतनवाडी येथील लहू महादू झडे याने पत्नी चांगुणा हिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यातून झालेल्या वादात लहूने चांगुणाला लाकडी काठीने जबर मारहाण केली, ज्यात ती गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना १७सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली.
चांगुणाबाईवर घोटी येथील समर्थ सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत चांगुणाबाईची बहीण हरणी महादू वळे (वय ३३, रा. पेंडशेत, ता. अकोले, मूळ रा. सुभाष रेसिडेन्सी, टिटवाळा ईस्ट, ता. कल्याण, जि. ठाणे) हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लहू महादू झडे याच्याविरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथके त्याचा शोध घेत आहेत.
Breaking News: Husband kills wife over suspicion of character