Breaking News | Akole: पोलिसांनी पाच दिवसांत धडक कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्या अकरा अड्ड्यांवर छापे टाकून देशी, विदेशी, गावठी, हातभट्टीची दारू असा १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
अकोले : तालुक्यातील वीरगाव फाटा येथे महिलांनी अवैध दारूविक्रीविरुद्ध एल्गार पुकारत रास्ता रोको आंदोलन छेडले होते. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी पाच दिवसांत धडक कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्या अकरा अड्ड्यांवर छापे टाकून देशी, विदेशी, गावठी, हातभट्टीची दारू असा १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
२४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत अकोले पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. चार पथके तयार करून नागवाडी, समशेरपूर, खिरविरे, धामोडी फाटा, पिंपळदरी, ब्राह्मणवाडा, कोतूळ, आंभोळ, रुंभोडी, कळस, आंबड आदी गावांत छापे टाकून धडक कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Breaking News: Illegal domestic and foreign liquor seized in Akole