अकोले तालुक्यात अवैध दारु पकडली, तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Breaking News | Akole Crime: टिटवी गावच्या शिवारात स्वतःच्या फायद्याकरीता देशी दारुची कारमधून अवैध वाहतूक करताना पोलिसांनी पकडले.
अकोले: तालुक्यातील टिटवी गावच्या शिवारात स्वतःच्या फायद्याकरीता देशी दारुची कारमधून अवैध वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ९६ हजार ९९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सदेश पांडुरंग साळुंके (वय २९, रा. ठाणगाव) याच्या विरोधात राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजूर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की टिटवी गावच्या शिवारात सदेश साळुंके हा स्वतःच्या फायद्याकरीता देशी दारुचे २६ खोके (९६ हजार ९९० रुपये) २ लाख रुपये किमतीच्या कारमधून (क्र. एमएच. १५, डीसी. २७६६)
विनापरवाना वाहतूक करताना मिळून आल्याने पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.
Breaking News: Illegal liquor seized in Akole taluka, goods worth three lakhs seized