Home अहिल्यानगर अहिल्यानगरमधील आयपीएस अधिकारी यांचे अपघाती निधन

अहिल्यानगरमधील आयपीएस अधिकारी यांचे अपघाती निधन

Breaking News | Accident: महाराष्ट्राचे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी डॉ. सुधाकर पठारे आणि त्यांचे सहबंधू भगवत खोडके यांचे आज तेलंगणातील श्रीशैलम, नागरकुरनूल येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात निधन.

IPS officer dies in accident in Ahilyanagar

अहिल्यानगर:  महाराष्ट्राचे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी डॉ. सुधाकर पठारे आणि त्यांचे सहबंधू भगवत खोडके यांचे आज तेलंगणातील श्रीशैलम, नागरकुरनूल येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात निधन झाले. ही घटना आज (ता. २९‌)  घडली. नागरकुरनूलचे पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

डॉ. सुधाकर पठारे हे साताराचे पोलीस अधीक्षक काही काळ होते. त्यानंतर त्यांची मुंबईला बदली झाली होती. ते २०११ सालचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील रहिवासी आहेत. आयपीएस होण्याअगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम.एस्सी. अॅग्री, एलएलबी झालेले आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना १९९५ साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर १९९६ साली विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून त्यांची निवड झाली. १९९८ साली पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलीस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलीस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली. एसपीएस डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मकोका), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलीस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.

Web Title: IPS officer dies in accident in Ahilyanagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here