राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, रेड अलर्ट, अतिवृष्टीसह पुरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता
Maharashtra Rain Alert: कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार.
पुणे: राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. IMD ने कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत रेड अलर्ट, तर काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसा, राज्यभर पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसह पुरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये पावसाचे स्वरूप तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून काही भागांत चक्री वारेही वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.
नद्या व नाल्यांना पूर येऊ शकतो, किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आणि मच्छिमारांनी समुद्रकिनाऱ्याला जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे. पुणे शहरातील काही सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होईल. पावसामुळे घाट परिसरातील वाहतूक विस्कळीत होऊ शकते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा
मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह होईल. ढगाळ हवामान राहणार आहे.
वादळी वारे व विजांमुळे पिके व फळबागांचे नुकसान होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
विदर्भात नागपूर व गोंदियात रेड अलर्ट
विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार आहे. विशेषतः नागपूर व गोंदियामध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. चंद्रपूर व अमरावतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. नदी-नाल्यांना पूर येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Breaking News: July Maharashtra Rain Alert