Home बीड अल्पवयीन मुलीचं अपहरण करून कॉफी शॉपमध्ये नको ते कृत्य; पोलीस ठाण्यात गुन्हा...

अल्पवयीन मुलीचं अपहरण करून कॉफी शॉपमध्ये नको ते कृत्य; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Breaking News | Beed Crime :एका अल्पवयीन मुलीला एका तरुणाने कॉफी शॉपमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना. 

Kidnapped a minor girl and committed an abused in a coffee shop

बीडच्या केजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून एका अल्पवयीन मुलीला एका तरुणाने कॉफी शॉपमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडलीय. या तरुणाने 20 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एका चौदा वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. यानंतर शहरातील एका कॉफी शॉपमध्ये घेवून जात तिच्यावर अत्याचार केले.

दरम्यान, हा प्रकार कुटूंबीयांना समाजताच त्यांनी तातडीने केज पोलीस ठाण्यात धाव घेते घडलेला प्रकार सांगितला. तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तसेच या प्रकरणाचा आधी तपास केज पोलीस करत आहे. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी केज शहरातील कॉफी शॉपवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे.

बीड मधील मावेजा गैरव्यवहार प्रकरणात शासकीय सेवेतील दोघांना निलंबित करण्यात आलंय. धुळे-सोलापूर महामार्ग भूसंपादन प्रकरणात वाढीव मावेजा लाटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून तब्बल 241 कोटींचा वाढीव मावेजा मंजूर करून घेण्यात आला. त्यातील 73 कोटी रुपयांचा मावेजा मिळवून शेतकऱ्यांना वाटप केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सहाय्यक महसूल अधिकारी संजय हंगे आणि सहाय्यक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील यांना निलंबित केले. तर कंत्राटी कर्मचारी अविनाश चव्हाण, अजहर शेख आणि त्र्यंबक पिंगळे या तिघांची सेवा समाप्त केली. दरम्यान, या प्रकरणात पाच वकिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पाचही वकील फरार आहेत. 73 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत केला जातो आहे.

Breaking News: Kidnapped a minor girl and committed an abused in a coffee shop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here