Home संगमनेर संगमनेर: कीर्तनकार भंडारेंकडून माजी मंत्री थोरातांना धमकी, व्हिडिओने खळबळ

संगमनेर: कीर्तनकार भंडारेंकडून माजी मंत्री थोरातांना धमकी, व्हिडिओने खळबळ

Breaking News | Bhandare on Balasaheb Thorat: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणारा तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या व्हिडिओने राज्यभर मोठी खळबळ उडाली.

Kirtankar Bhandare threatens former minister Balasaheb Thorat, video creates stir

संगमनेर:   माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणारा तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या व्हिडिओने राज्यभर मोठी खळबळ उडाली असून भंडारे यांनी व्हिडिओद्वारे ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल’ अशी थेट धमकी दिली आहे. याबाबत महाराष्ट्र काँग्रेस, विजय वडेट्टीवर आदी नेत्यांनी ट्विट करून तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहे. संगमनेरमधील घुलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना राजकीय पक्षांची बाजू घेऊन बोलताना गावकर्‍यांनी अभंग सोडवण्याची विनंती केली. यावर धार्मिक संघटनांनी राजकारण करून गोंधळ निर्माण केला.

समाज माध्यमांवर व इतर ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शांतता राखा असे सांगतानाच करून धर्मपिठाचे पावित्र्य राखावे असे आवाहन केले. कीर्तनकार व समाजप्रबोधकांनी थोर संतांची परंपरा जपताना मानवतेचा धर्म पुढे न्यावा असे स्पष्ट केले. याचबरोबर संगमनेरची सुसंस्कृत राजकीय परंपरा जपावी अशी विनंती केली.

यानंतर रात्री तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना थेट धमकी दिल्याने राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेने संगमनेरमधील गावागावांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक गावांमधून आता आज संगमनेरकडे कूच होणार आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली असून पुरोगामी संघटना, हिंदुधर्मीय व वारकरी संप्रदायाने सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

Breaking News: Kirtankar Bhandare threatens former minister Balasaheb Thorat, video creates stir

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here