Home अकोले अकोले शहरात बिंगो जुगारावर ‘एलसीबी’चा छापा

अकोले शहरात बिंगो जुगारावर ‘एलसीबी’चा छापा

Breaking News | Akole Raid: बिंगो ऑनलाईन जुगारावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.18) छापा टाकत 16 आरोपींकडून 4 लाख 98 हजार 700 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य जप्त.

LCB raids bingo gambling in Akole city

अकोले: शहरात सुरू असलेल्या बिंगो ऑनलाईन जुगारावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.18) छापा टाकत 16 आरोपींकडून 4 लाख 98 हजार 700 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. यामुळे अवैध धंदेचालकांत एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहे.

त्यानुसर एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, आकाश काळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन कारवाईस रवाना केले. दरम्यान, सोमवारी हे पथक अकोले शहरातील अवैध धंद्यांची माहिती काढत असताना बसस्थानकासमोरील नवले कॉम्प्लेक्समधील एका गाळ्यामध्ये काही लोक ऑनलाईन बिंगो, मटका व डॉलर नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली.

सदर ठिकाणी पथकाने छापा (Raid) टाकला असता नितीन निवृत्ती गायकवाड (वय 30), अमोल मारुती मोहिते (वय 25, दोघेही रा. इंदिरानगर, अकोले), वैभव राजेंद्र गायकवाड (वय 25, रा. कुंभारवाडा, अकोले), व्हेल्सी गफुर वाघिलो (वय 30, रा. शाहुनगर, अकोले), अक्षय बाबासाहेब सकट (वय 24, रा. शिवाजीनगर, अकोले), गोपी भाऊराव आवारी (वय 26, रा. धामणगाव, ता. अकोले), अरबाज मोहम्मद शेख (वय 25, रा. शिवाजी चौक, अकोले), आकाश संजय परदेशी (वय 32, रा. कुंभारवाडा, अकोले), रमेश एकनाथ फापाळे (वय 30, रा. लिंगदेव, अकोले), अनिल बाळू पवार (वय 35, रा. शाहूनगर, अकोले), विकास दत्तात्रेय आंबरे (वय 29, रा. गणोरे, अकोले), खंडू केरु सदगीर (वय 28, रा. खिरविरे, अकोले), शंशीकांत मुरलीधर बेणके (वय 30, रा. खिरविरे, अकोले), अशोक राजेंद्र जगताप (वय 25, रा. शिवाजी महाराज चौक, अकोले), गणेश हौसराव साबळे (रा. शनि मंदिरच्या पाठीमागे, अकोले (फरार)), अतुल जालिंदर नवले (रा. अगस्ति आगार, अकोले (फरार)) हे मिळून आले.

त्यांच्याकडून 4 लाख 98 हजार 700 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोकॉ. आकाश काळे (स्थानिक गुन्हे शाखा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Breaking News: LCB raids bingo gambling in Akole city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here