Home संगमनेर संगमनेरमध्ये अवैध दारु विक्रेत्यांवर एलसीबीची कारवाई

संगमनेरमध्ये अवैध दारु विक्रेत्यांवर एलसीबीची कारवाई

Breaking News | Sangamner Crime: ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त; चौघांवर गुन्हा दाखल

LCB takes action against illegal liquor sellers in Sangamner

संगमनेर: अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यांवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. संगमनेरमध्ये बुधवारी (दि.१) दोन ठिकाणी कारवाई करुन सुमारे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, घुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या दारुची विक्री करताना पथकाने रामनाथ चांगदेव शिरसाठ (वय ४५) व उमेश आनंद सदा (वय ३१, दोघेही रा. संगमनेर) यांना पकडले. त्यांच्याकडून ६३८० रुपयांची विदेशी दारु आणि ६० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच. १७, सीएच. ८६४५) असा एकूण ६६ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

याप्रकरणी पोकॉ. बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील दोघांसह वेदांत वाईन शॉपचे चालक /केला आहे. दुसरी कारवाई देखील याच परिसरात करण्यात आली. तेथे संतोष अर्जुन खरात (वय ३५, रा. संगमनेर) यास अवैधरित्या दारुची विक्री करताना पकडले. त्याच्याकडून पथकाने ३८४० रुपयांची देशी व ४००० हजार रुपयांची विदेशी दारु असा एकूण ७८४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी पोना. राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खरात याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दारु विकत घेणाऱ्याचा परवाना तपासून त्यास ठरलेल्या कोठ्याप्रमाणे दारु विकण्याचा नियम आहे. तरी देखील वेदांत वाईन शॉपमध्ये सर्रासपणे कोणालाही खोकेच्या खोके दारु विकली जात आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश दिसून येत आहे. या कृतीमुळे नगर एलसीबीने कारवाई करताना त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दररोज दारु विक्री होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

Breaking News: LCB takes action against illegal liquor sellers in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here