Home अहिल्यानगर अहिल्यानगर: बिबट्याने पाच वर्षांच्या मुलीला नेले उचलून

अहिल्यानगर: बिबट्याने पाच वर्षांच्या मुलीला नेले उचलून

Breaking News | Ahilyanagar: सायंकाळी साडे सहा वाजता खारे कर्जुने येथून घरच्यांसमोर बिबट्याने पाच वर्षाच्या मुलीला उचलून नेले.

Leopard carries away five-year-old girl

अहिल्यानगर: नगर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मंगळवारी (दि.11) कामरंगाव येथे अज्ञात वाहनांच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असताना बुधवारी (दि.12) सायंकाळी साडे सहा वाजता खारे कर्जुने येथून घरच्यांसमोर बिबट्याने पाच वर्षाच्या मुलीला उचलून नेले. रियांका सुनील पवार असे तिचे नाव आहे. रात्री उशीरापर्यंत तिचा शोध लागला नव्हता. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, खारेकर्जुने येथे शेतात काही कुटुंबे शेतमजूर म्हणून काम करत आहेत. शेतावर वस्ती असल्याने कुटुंबातील काही सदस्य सायंकाळी साडेसहा वाजता थंडी वाढल्याने शेकोटी करून शेकत बसले होते. त्यावेळी रियांका सुनील पवार ही पाच वर्षांची मुलगी जवळच खेळत होती. त्याचवेळी शेजारील तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या आला आणि घरच्या लोकांच्या समोर रियांकाला उचलून नेले. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.

कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण काहीही हाती लागले नाही. गावातील लोकांना ही बातमी समजताच त्यांनी वस्तीवर मोठी गर्दी केली. गावातील लोकांनी शोधमोहीम हाती घेतली, पण रियांका सापडली नाही. पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Breaking News: Leopard carries away five-year-old girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here