Home संगमनेर संगमनेर: भरदिवसा बिबट्या घुसला गोठ्यात; ७ बोकड केले फस्त

संगमनेर: भरदिवसा बिबट्या घुसला गोठ्यात; ७ बोकड केले फस्त

Breaking News | Sangamner: बंदिस्त गोठ्यात बिबट्या घुसला. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ७ बोकड जागीच ठार झाले. कुटुंबाचे मोठे नुकसान.

Leopard enters cowshed in broad daylight kills 7 goats

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी-अजमपूर परिसरात बंदिस्त गोठ्यात बिबट्या घुसला. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ७ बोकड जागीच ठार झाले, तर ३ बोकड गंभीर जखमी झाले. बुधवारी (दि. १९) दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे सावट आहे.

लावरे कुटुंबीय असल्याने अल्पभूधारक त्यांची उपजीविका शेळीपालनावर आहे. काही शेळ्या घेऊन लावरे हे रानात चारण्यासाठी गेले होते. गोठ्यात १० ते १२ बोकड बांधलेले होते. दुपारी घरात कोणी नसल्याची संधी साधत दबा धरलेल्या बिबट्याने जाळी फोडून आत प्रवेश केला आणि बोकडांवर हल्ला चढवला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते भारतराव गीते यांनी घटनास्थळी धाव घेत वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. डॉ. नागरगोजे यांनी पंचनामा करीत

लावरे कुटुंबाचे उपजीविकेचे साधन हिरावले गेल्याने त्यांच्यावर संकट ओढावले आहे. दरम्यान, पिंपरी लौकी आणि पानोडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. कदम, मुंढे, बोंद्रे, सय्यद, धानापुणे या वस्त्यांच्या भागात बिबट्यांचे नेहमीच दर्शन होत असते. महिनाभरापूर्वी बोंद्रे वस्तीवरून एक मादी व पिल्लू पकडण्यात आले होते. तरीही पुन्हा दोन ते तीन बिबट्यांचा वावर दिसत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

सध्या कांदा काढणी, कापूस वेचणी आणि रब्बी पीक पाणीपुरवठ्याचा हंगाम सुरू आहे. बिबट्याच्या भीतीने महिला मजूर आणि शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणेही धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा; अन्यथा रास्तारोकोसह तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Breaking News: Leopard enters cowshed in broad daylight kills 7 goats

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here