खिडकी तोडली, घरात घुसला, नराधमाने 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केला
Breaking News | Mumbai Crime: घराची खिडकी तोडून घरात घुसून या नराधमाने बलात्कार केला.
मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात एका 17 वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली. घराची खिडकी तोडून घरात घुसून या नराधमाने हा प्रकार केला. ही घटना शुक्रवारी (30 मे 2025) घडली असून, पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. विक्रोळी पार्कसाइट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव समीर शेख (वय 31) आहे.
अधिक माहिती अशी की, त्याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडण्यात आलं आहे. समीर शेख याने शुक्रवारी पीडित मुलीच्या घरात खिडकी तोडून प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. पीडितेने आणि तिच्या कुटुंबाने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.
विक्रोळी पार्कसाइट पोलीस ठाण्याचे वरीष्ठ अधिकारी यांनी याबद्दल माहिती दिली. आरोपी समीर शेख याच्यावर भारतीय दंड संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा अंतर्गत बलात्कारासह इतर गंभीर गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही तपासणी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला असून, लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.
पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता आहेत. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या रेकॉर्डची तपासणी सुरू आहे. पोलिसांनी पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत आणि संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
Breaking News: Man breaks window, enters house, rapes 17-year-old girl