Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पुलावर पेरूवाल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

अहिल्यानगर: पुलावर पेरूवाल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: कोल्हार येथील पुलावर एका पेरूवाल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना.

Man crushed to death under truck on bridge

कोल्हार: कोल्हार येथील पुलावर एका पेरूवाल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सलीम पेरुवाले नावाने ओळखले जाणारे सलीम शेख हे शुक्रवारी नमाज आटोपून कोल्हारच्या पुलावरून सायकल वर चालले असता त्यांना मालट्रकचा धक्का लागला टोल जावून ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

सलीम बाबू शेख (वय ६३) नावाचे व्यक्ती सायकलवरून जात असताना त्यांना मालट्रकने धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले.

अपघातानंतर मालट्रकचा चालक पळून गेला, परंतु स्थानिक युवकांनी पाठलाग करून ट्रक पकडला.या घटनेमुळे कोल्हार भगवतीपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातामुळे पुलावर सुमारे तीन ते साडेतीन तास वाहतूक खोळंबली होती.

Breaking News: Man crushed to death under truck on bridge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here