Home अकोला सलग पाच दिवस विवाहितेवर लैंगिक अत्याचार

सलग पाच दिवस विवाहितेवर लैंगिक अत्याचार

Breaking News | Akola Crime: इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेने नवसाचा बहाणा करुन पीडित विवाहितेला अज्ञात ठिकाणी नेले. या विवाहित महिलेवर सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार.

marital sexual harassment for five consecutive days

अकोला: इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेने नवसाचा बहाणा करुन पीडित विवाहितेला अज्ञात ठिकाणी नेले. या विवाहित महिलेवर सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी नवरा-बायकोसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याची घटना अकोल्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलीय. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील बार्शीटाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी विवाहित महिलेची ओळख दोन महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर आरोपी महिला ज्योती हिवराळे हिच्यासोबत झाली होती. फिर्यादी महिलेला मूलबाळ होत नसल्याने, नवस करण्याच्या निमित्ताने ज्योतीने तिला मंदिरात घेऊन जाण्याचे आमिष दाखवले.

ज्योती हिवराळे, तिचा पती नागेश हिवराळे आणि सुपेश पाचपोर यांनी संगनमत करून 5 ते 9 मे 2025 दरम्यान फिर्यादी महिलेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महिलेच्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा बुलढाणा जिल्ह्यातून शोध घेत अटक केली आहे. सध्या तिघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, अधिक तपास सुरू आहे.

Breaking News: marital sexual harassment for five consecutive days

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here