Home पुणे पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता

पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता

Breaking News | Pune Crime: दौंड हादरले! पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

Minor girl on her way to Pandharpur abused

 दौंड: आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व आध्यात्मिक उत्सव मानला जातो. या काळात संपूर्ण राज्यात भक्तीमय वातावरण, उत्साह आणि चैतन्याची लहर पाहायला मिळते. वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी ‘माऊली-माऊली’चा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. आता या वारीतून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. माहिती अशी की, पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले. या दोन जणांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला.

यानंतर दोन जणांनी वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले आहेत. या घटनेमुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अज्ञातांचा शोध घेत असून या आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

Breaking News: Minor girl on her way to Pandharpur abused

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here