संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पाच महिन्यांची गर्भवती
Breaking News | Sangamner Crime: तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच व पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा हा घृणास्पद प्रकार समोर.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच व पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा हा घृणास्पद प्रकार समोर आला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, पंडित हिरामण वैराट, संग्राम उर्फ शेरू पंडित वैराट (सर्व रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी पंडित हिरामण वैराट याने पीडित मुलीच्या अल्पवयीन असण्याचा आणि अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. यामुळे मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. अन्य आरोपींनी या संदर्भात पीडिता अथवा तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.
या घटनेने संगमनेर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 64, 65, 64(फ), 333, 351 (2) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 5 (1), 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास दुमणे यांनी दिली आहे.
Breaking News: Minor girl raped, five months pregnant