अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
Breaking News | Ahilyanagar Crime: एका १६ वर्षीय महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचे अपहरण.
राहुरी: राहुरी शहर हद्दीतून दि. २० मे रोजी दुपारच्या दरम्यान एका १६ वर्षीय महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. पीडित मुलीचे एका तरुणाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ वर्षे ६ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दि. २० मे २०२५ रोजी दुपारच्या दरम्यान ती तरुणी
त्यांच्या राहुरी शहर हद्दीत असलेल्या दुकानामध्ये बसली होती. त्यावेळी एक तरुण तेथे बसलेला होता. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र ती कोठेही मिळून आली नाही. अल्पवयीन मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: minor girl was lured and abducted