Home अहिल्यानगर अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Breaking News | Ahilyanagar Crime:  अल्पवयीन मुलीशी अश्लील बोलून तिला लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य वर्तन करून विनयभंग केला व जाब विचारणार्‍या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना.

Molestation of a minor girl

अहिल्यानगर: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील बोलून तिला लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य वर्तन करून विनयभंग केला व जाब विचारणार्‍या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना नगर शहरातील एका उपनगरात 28 मे रोजी सकाळी घडली.

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने 30 मे रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी ही घराच्या गच्चीवर पावसाचे साचलेले पाणी काढत असताना बाळासाहेब वाघमारे याने घराच्या भिंती लगत असलेल्या जिन्यावर आला आणि अल्पवयीन मुलीस, ‘तुला आंबे पाहिजे का’ असे म्हणून तिच्या अंगाला स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

या घटनेने घाबरून मुलीने हा प्रकार तिची बहीण व मेव्हणा यांना सांगितला. ही घटना ऐकून मुलीची बहीण व मेहुणा यांनी येथे येऊन वाघमारे यास विचारणा केली असता, वाघमारे याची पत्नी, मुलगी, मुलगा व मुलाचा एक मित्र यांनी त्यांना शिवीगाळ करून लाकडी बॅट, लोखंडी रॉड, काठी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पीडित मुलगी व तिचा मेव्हणा दोघे जखमी झाले.

 याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब वाघमारे, हरणाबाई वाघमारे, रेणुका वाघमारे, विवेक वाघमारे, सीऑन भोसले यांच्याविरूध्द विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहे.

Breaking News: Molestation of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here