मान्सूनची एन्ट्री झाल्यानंतर पहिल्या पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ
Breaking News: Monsoon Alert; मान्सून’ची महाराष्ट्रात एन्ट्री झाल्यानंतरचा पहिला पाऊस आज सकाळी नाशकात झाला. अकराच्या सुमारास अचानक ढग दाटून आले.
नाशिक: ‘मान्सून’ची महाराष्ट्रात एन्ट्री झाल्यानंतरचा पहिला पाऊस आज सकाळी नाशकात झाला. अकराच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. यानंतर सर्वत्र पावसाचे वातावरण झाले होते. त्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.
नाशिक, अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या भागात मान्सूनच्या वाटचालीस वातावरण अनुकूल तयार झाले आहे. बुधवार दि.२८ ते शनिवार दि.३१ मे दरम्यानच्या चार दिवसात खान्देश, नाशिक तसेच संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली हेाती त्याची प्रचीता आज आली.
दरम्यान, या पावसाने नाशिकच्या आठवडे बाजारावर पाणी फिरल्याचे दिसून आले. दर बुधवारी गोदावरी काठी बाजार भरतो. त्यासाठी धान्य बाजारात विविध शेतकरी माल घेऊन येतात. मात्र आाजच्या पावसाने त्यांची मोठी तारांबळ उडाली.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, सिन्नर, निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, याठिकाणी देखील पावसाने आज जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तसेच लासलगाव बाजार पेठ व मार्केट कमिटी शॉपिंगमध्ये पाणी शिरले होते. तर नांदूर शिंगोटेसह परिसरामध्ये सुमारे एक तास जोराच्या पावसाने हजरी लावली.
Breaking News: Monsoon 2025 entry Rain Alert