Home अहिल्यानगर मुलासमोर आईचा अंत, ट्रेलर-पिकअप टेम्पो अपघातात महिला ठार

मुलासमोर आईचा अंत, ट्रेलर-पिकअप टेम्पो अपघातात महिला ठार

Breaking News | Accident: लोखंडी रॉडने फरपटला टेम्पो : गुंड गणेश विसर्जन करून गावाहून मुंबईकडे निघालेल्या दोन पिकअप टेम्पोला लोखंडी सामान वाहून नेणाऱ्या ट्रेलरची जोरदार धडक बसून एकजण जागीच ठार.

Mother dies in front of her child, woman killed in trailer-pickup tempo accident

तळेगाव दाभाडे | Parner:  गणेश विसर्जन करून गावाहून मुंबईकडे निघालेल्या दोन पिकअप टेम्पोला लोखंडी सामान वाहून नेणाऱ्या ट्रेलरची जोरदार धडक बसून एकजण जागीच ठार, तर एका चिमुरड्यासह पाचजण जखमी झाले. या अपघातात पारनेर तालुक्यातील शालूबाई विष्णू गुंड यांचा मृत्यू झाला.

हा अपघात तळेगाव-चाकण महामार्गावरील माळवाडी येथे रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झाला. अपघातानंतर ट्रेलरचालक वाहनासह पसार झाला. जखमींना तळेगाव स्टेशन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. शालूबाई विष्णू गुंड (६७, रा. कामोठे, पनवेल, नवी मुंबई, मूळ रा. वडगाव दर्या, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा पिकअप चालक स्वप्निल विष्णू गुंड (३४) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संदेश हरिश्चंद्र ढेरे (१९), रंगनाथ गंगाराम आहेर (३६), शीतल रंगनाथ आहेर (३४), शिवांश रंगनाथ आहेर (वय ५ वर्षे, सर्व रा. कामोठे, पनवेल, नवी मुंबई, मूळ रा. आणे, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी जखमींची नावे आहेत. ट्रेलरच्या बाहेर आलेल्या लोखंडी सामानाने पिकअप टेम्पोला फरपटत नेले. ट्रेलरमधील लोखंडी सामान रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Breaking News: Mother dies in front of her child, woman killed in trailer-pickup tempo accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here