Home अहिल्यानगर आईचे रक्षाबंधन राहिले अधुरे; आईची दोन चिमुकल्यांसोबत आत्महत्या

आईचे रक्षाबंधन राहिले अधुरे; आईची दोन चिमुकल्यांसोबत आत्महत्या

Breaking News | Ahilyanagar:  पाच लाखांच्या मागणीसाठी छळ; सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोन मुलांसह विहिरीत उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली.

Mother's Raksha Bandhan remains incomplete; Mother commits suicide with two children

खर्डा (जि. अहिल्यानगर) घर बांधण्यासाठी तसेच विहीर खोदण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून दोन मुलांसह विहिरीत उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. नायगाव (ता. जामखेड) येथे शुक्रवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. रुपाली नाना उगले (वय २५) व तिचा मुलगा समर्थ (वय ६) व मूलगी साक्षी (वय ४) अशी मृतांची नाते आहेत.

याबाबत मृत रुपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी खर्डा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मृत रुपालीचा पती नाना प्रकाश उगले, सासरा प्रकाश पंढरीनाथ उगले, नणंद मनीषा शिवाजी टाळके व नणंदेचा पती शिवाजी गोरख टाळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार मूलगी रूपाली नाना उगले (वय २५) हिचा विवाह नायगात येथील नाना प्रकाश उगले याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर मागील दीड वर्षापासून सासरी रुपालीचा मानसिक आर्थिक छळ सुरू होता. सुरुवातीला तिच्या पतीने दोन लाखांची मागणी केली. रुपालीच्या वडिलांनी ही रक्कम दिली. त्यानंतर पतीचे नातेवाईक मनीषा शिवाजी टाळके व शिवाजी गोरख टाळके यांनी घर बांधण्यासाठी, विहीर खोदण्यासाठी पुन्हा ५ लाख रुपये माहेराहून आणण्याची मागणी केली. ‘तू संसार करू शकत नाही. घरातील काम करीत नाहीस. पतीकडे लक्ष देत नाही. दोन दिवसांत त्याचे दुसरे लग्न लावून देऊ’, अशा धमक्या देत सासरी तिचा मानसिक छळ होत होता, शुक्रवारी सायंकाळी मुलगा समर्थ शाळेतून घरी आल्यावर शाळेच्या गणवेशातच मुलगा समर्थ व

चिमुकली साक्षी हिव्यासह रुपालीने छळाला कंटाळून साडेपाच वाजता घराजवळच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

सायंकाळी पती नाना उगले व सासरा प्रकाश उगले हे शेतातून घरी आले असता त्यांना रूपाली व दोन्ही मुले घरात दिसली नाहीत. त्यांनी परिसरात शोध घेतला असता, विहिरीच्या काठावर चपला दिसल्या. त्यानंतर ही घटना समोर आली. याबाबत माहिती मिळताच खर्डा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता.

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीत बोरीच्या काठ्धा टाकून रात्री उशिरा तिघांचे मृतदेह बाहेर काढले. शनिवारी सकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर रूपाली यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर दोन्ही चिमुकल्यांना घरासमोर दफन करण्यात आले.

राखी बांधायचे राहूनच गेले, गावकरी गहिवरले

रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. त्यामुळे भावाच्या हाताला राखी बांधण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले, रुपालीसह साक्षीनाही आपल्या लाडक्या दादाला (समर्थ) रात्री चांधता आली नाही. बहीण-भावांचे निष्याण देह पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. राक्षाबंधन सणाल्या दिवशीच गावाला या चिमुकल्या भावंडांची अंत्ययात्रा पाहावी लागली.

पती-सासऱ्याला अटक, इतर दोघे पसार

रूपाली उगले हिच्यासह तिधांच्या आत्महत्याप्रकरणी खडा पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रूपालीचा पती नाना उगले व सामरा प्रकाश उगले यांच्या मुसक्या आवळल्या, नणंद व तिचा पती हे दोन आरोपी पसार झाले असून खर्डा पोलिस त्यांचा शोथ घेत आहेत.

Breaking News: Mother’s Raksha Bandhan remains incomplete; Mother commits suicide with two children

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here