Home अहिल्यानगर प्रेमसंबंधातून खून; आणखी एका आरोपीला केली अटक

प्रेमसंबंधातून खून; आणखी एका आरोपीला केली अटक

Breaking News | Ahilyanagar: छ. संभाजीनगरच्या तरुणाची हत्या : सापळा रचून जेरबंद.

Murder over love affair Another accused arrested

अहिल्यानगर : छत्रपती संभाजीनगर येथील तरुणाच्या हत्याप्रकरणातील फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून प्रवरासंगम येथून शनिवारी अटक केली. अफरोज सुलतान खान (वय ४५, रा. कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे छत्रपती संभाजीनगर येथील सचिन पुंडलिक औताडे (वय ३०, रा. कोलठाणवाडी रोड, छत्रपती संभाजीनगर) यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दुर्गेश मदन तिवारी (रा. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) व भारती रवींद्र दुबे (रा. कॅनॉटप्लेस, सिडको, छत्रपती संभाजीनगर) अशा दोघांना अटक केली आहे. यातील अफरोज खान हा फरार होता. तो शनिवारी नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील प्रवरासंगम येथे येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून खान याला अटक केली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

Breaking News: Murder over love affair Another accused arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here