संशयावरून चाकूने वार करून केला खुन; कुकरचे झाकण डोक्यात घातले
Breaking News | Pune Crime: तरुणावर संशयावरुन चाकूने वार करुन खुन केल्याचा प्रकार.
पुणे : गावावरुन आलेल्या तरुणावर संशयावरुन चाकूने वार करुन खुन केल्याचा प्रकार नन्हेमध्ये उघडकीस आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
राजू दादु आरु (वय ४२, रा. नन्हे, मुळ रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. अनिल अशोक जाधव (वय ४०, रा. नन्हे, मुळ रा. श्रीरामपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिल जाधव हा आपल्या पत्नीसह नन्हेमध्ये राहतो. त्यांच्याकडे श्रीरामपूरवरुन राजू आरु हा आला होता. राजू आणि अनिल हे दोघेच घरात होते. अनिल याची पत्नी बाहेर गेली होती. दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा अनिल याने चाकूने राजूवर हल्ला केला. तो जखमी झाला असताना कुकरचे झाकण डोक्यात घातले. राजू याचा जागीच मृत्यु झाला. सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी अनिल जाधव याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.
Breaking News: Murdered by stabbing on suspicion