Home अहिल्यानगर अहिल्यानगर: अल्पवयीन मुलींकडे पाहून अश्लील चाळे

अहिल्यानगर: अल्पवयीन मुलींकडे पाहून अश्लील चाळे

Breaking News | Ahilyanagar Crime: सायंकाळी खेळत असलेल्या अल्पवयीन मुलींकडे पाहून एका अनोळखी व्यक्तीने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली.

Nagar Obscene gestures towards minor girls

अहिल्यानगर: नगरच्या सावेडी उपनगरातील एका कॉलनीत २९ जुलै रोजी सायंकाळी खेळत असलेल्या अल्पवयीन मुलींकडे पाहून एका अनोळखी व्यक्तीने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील:

मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कॉलनीतील काही अल्पवयीन मुली खेळत असताना, नर्सरी शाळेसमोर लाल-काळ्या रंगाच्या प्लेझर स्कुटीवर उभा असलेला, डोक्यावर टक्कल असलेला एक अनोळखी इसम त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता.

मुलींनी घाबरून घरी पळत जाऊन ही बाब पालकांना सांगितली. पालकांनी खाली येऊन पाहिले असता, तो इसम घटनास्थळावरून पळून गेला होता.

या घटनेचे कॉलनीतील काही पालकांनी आणि शेजाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिले असून, त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

कॉलनीत लावण्यात आलेल्या खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संबंधित व्यक्तीचा प्रकार कैद झाला असून, कॅमेऱ्यात स्कुटीचा अर्धा नंबर (७७२१) स्पष्ट दिसत आहे.

फिर्यादीसह परिसरातील नागरिकांनी सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार पाहिला आणि त्यानंतर तात्काळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

Breaking News: Nagar Obscene gestures towards minor girls

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here