Home संगमनेर इंदुरीकर महाराजांचा नवीन व्हिडीओ; म्हणाले, लग्न…….

इंदुरीकर महाराजांचा नवीन व्हिडीओ; म्हणाले, लग्न…….

Breaking News | Indurikar Maharaj: सोशल मीडियातून व्यक्तीगत टीका झाल्या. या टीकेमुळे इंदुरीकर महाराजांना मोठा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्याचं दिसून आले. त्यानंतर आता इंदुरीकर महाराजांचा आणखी एक नवीन व्हिडीओ.

New video of Indurikar Maharaj

Indurikar Maharaj New Video: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यावरुन त्यांच्यावर मोठ्या टीका देखील झाल्या, दुसऱ्यांना साधेपणानं लग्न करण्याचे उपदेश देणार महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात असं म्हणत त्यांच्यावरती सोशल मीडियातून व्यक्तीगत टीका झाल्या. या टीकेमुळे इंदुरीकर महाराजांना मोठा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्याचं दिसून आले. त्यानंतर आता इंदुरीकर महाराजांचा आणखी एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंदुरीकर महाराज यांच्या कन्येच्या नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्याच्या निमित्ताने महाराजांवर झालेल्या वैयक्तिक टीकेमुळे ते अत्यंत व्यथित झाले. विशेषतः मुलीच्या पेहरावावरून आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या होत्या. या टीकेमुळे कंटाळलेल्या इंदुरीकर महाराजांनी थेट कीर्तनसेवा थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले असताना आता 10 नोव्हेंबर रोजीचा बदगी येथील कीर्तनातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इंदुरीकर महाराजांनी लग्न जोरात करणार…काय बोंबलायचंय बोंबला असं म्हटलं आहे. तसेच एकीकडे 30 मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटीचा खर्च होतो, तेव्हा कोणत्याही चँनेलवाल्यांनी राजकारण्यांना पैसे कुठून आणले विचारुन दाखवावं, असंही इंदुरीकर महाराज बोलताना दिसत आहेत.

Breaking News: New video of Indurikar Maharaj

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here