संगमनेरातील महिला अत्याचार प्रकरणी एकास राजस्थानमधून अटक तर एक अद्याप फरार
Breaking News | Sangamner Rape Case: फोन करून बोलावून घेतले त्याने देखील पीडित महिलेवर अत्याचार केले तसेच कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकू अशी धमकी.
संगमनेर – मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर दोघाजणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर घारगाव संगमनेर पोलिसांनी यातील एका आरोपीला थेट राजस्थान मधून जेरबंद केले आहे. पकडलेल्या आरोपीला शनिवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात तारखेपर्यंत पोलीस करून ठेवण्याचा आदेश दिले. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्यापही फरारच आहे.
१५ सप्टेंबरला घडलेल्या या प्रकाराला पीडित महिलेने १ ऑक्टोंबरला संगमनेरच्या घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर वाचा फुटली होती. याप्रकरणी पोलिसांनी गणपत उर्फ गणेश जैसाजी प्रजापति (वय २६ वर्ष, मूळ रा. मंडवारीया पोस्ट बरलूट, ता. जि. सिरोही, राजस्थान) आणि सैफुल्ला अबूतय्यब शेख (हल्ली रा. १४ नंबर, नारायणगाव, पुणे) या दोघां विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ३५१(१) (३), ३(५), अनुसूचित जाती व जमाती अधिनियम कलम ३(२) (५) अनुसार गुन्हा दाखल केला होता. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे या प्रकरणी तपास करत होते.
फिर्यादी पिडीत महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी अकलापूर रोडवर घारगाव येथे भोलेशंकर नावाच्या पाणीपुरीच्या दुकानात पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती. तेव्हा पाणीपुरी विक्री करणाऱ्या गणेश प्रजापती यांनी फिर्यादीस तुझ्या भावाला माझ्याकडे पाणीपुरीच्या दुकानावर कामाला पाठव असे सांगितले. तेव्हा फिर्यादीने त्याला नकार दिल्याने आरोपी गणेश प्रजापती यांनी घरी साफसफाईचे काम करणार का अशी विचारणा करत फिर्यादीला घरी घेऊन गेला. तेथे फिर्यादीच्या संमतीशिवाय त्याने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर प्रजापती आणि दुसरा आरोपी बेकरीवाला सैफुल्ला शेख याला फोन करून बोलावून घेतले त्याने देखील पीडित महिलेवर अत्याचार केले तसेच कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली असल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर दोन्ही आरोपी फरार झाले.
तपास अधिकारी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके नेमण्यात आली होती. यातील एक आरोपी गणेश प्रजापती हा राजस्थानमध्ये आपल्या घरी असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. पीएसआय अजय कवठे, हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, पोलीस नाईक दत्तू चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या घराचा शोध घेत तेथून आरोपीला ताब्यात घेत शनिवारी पहाटे त्याला अटक केली.
तपास अधिकाऱ्यांच्यावतीने घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर व सुभाष बोडके यांनी शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी न्यायालयाकडे आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. नेरर्लेकर यांनी आरोपीला सात ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांनी दिली आहे.
Business insurance, Auto insurance, Car insurance, Life insurance makes your life success. You don’t need to pray to God any more when there are storms in the sky, but you do have to be insured.”
Breaking News: One arrested from Rajasthan in Sangamnera woman rape case