Home अहिल्यानगर अहिल्यानगर:  झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या

अहिल्यानगर:  झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या

Breaking news | Ahilyanagar Suicide: राहत्या घराजवळील शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना.

One commits suicide by hanging himself from a tree

नगर: अज्ञात कारणाने आलेल्या नैराश्यातून एकाने राहत्या घराजवळील शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील डोंगरगण शिवारात बुधवारी (दि. १७) पहाटे उघडकीस आली. यशवंत बाळासाहेब दाणी (चय ३८, रा. डोंगरगण, ता. नगर) असे मृताचे नाव आहे.

यशवंत यांच्या पत्नी पहाटेच्या सुमारास झोपेतून उठल्या असता त्यांना ते घरात दिसून आले नाहीत, तसेच घराचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे त्यांनी बाहेर जाऊन शोधाशोध केली असता घराजवळ असलेल्या शेतातील झाडाला यशवंत यांनी गळफास

घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने नातेवाईकांना हाका मारल्या. त्यांचे नातेवाईक तेथे जमा झाल्यावर यशवंत यांना फकिरा लक्ष्मण दाणी यांनी तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. खराडे यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबतच्या अहवालावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत यशवंत यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, २ भाऊ असा परिवार आहे.

Breaking News: One commits suicide by hanging himself from a tree

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here