Home अहिल्यानगर अहिल्यानगर: प्रवरा नदीत उडी घेवून एकाची आत्महत्या

अहिल्यानगर: प्रवरा नदीत उडी घेवून एकाची आत्महत्या

Breaking News: प्रवरानदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीने पुलावरून उडी मारून आपली जीवनयात्रा (Suicide) संपवली.

One commits suicide by jumping into Pravara river

उक्कलगाव: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे प्रवरानदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीने पुलावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवार सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच बेलापूर खुर्दचे पोलीस पाटील युवराज जोशी व महसूल सेवक सुनील बाराहाते घटनास्थळी हजर झाले होते.

परंतु ही घटना वार्‍यासारखी बेलापूर व परिसरात पसरली. हा व्यक्ती उडी मारत असताना आजूबाजूला असलेल्या लोकांनी पाहिले असून, पुलावर उडी मारताना त्याने आपली चप्पल पुलावर ठेवून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. हा व्यक्ती कोण आहे? कुठला आहे? याची माहिती अजून मिळाली नाही. सांयकाळी पाचपर्यंत सदर व्यक्तीचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता. पावसाच्या आगमनामुळे शोध मोहीमेमध्ये अडथळा निर्माण झाल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली.

Breaking News: One commits suicide by jumping into Pravara river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here